Welcome



वेबसाईट निर्मिती श्री.नवनाथ सुर्यवंशी सर

Saturday, 3 January 2026

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना धारणगाव जिल्हा परिषद शाळेत अभिवादन...!

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना धारणगाव जिल्हा परिषद शाळेत अभिवादन...!

​धारणगाव (प्रतिनिधी):
येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्त्री शिक्षणाच्या जननी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी शाळेतील विद्यार्थिनी, माता पालक आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली.
​कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. शाळेतील मुलींच्या व माता पालकांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रतिमा पूजन करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थिनी वैष्णवी रणशूर हिने सावित्रीबाईंच्या संघर्षावर आधारित प्रेरणादायी भाषण केले. शिक्षक नवनाथ सूर्यवंशी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याचा आणि त्यांनी स्त्री शिक्षणासाठी भोगलेल्या कष्टांचा आढावा घेत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे शाळेतील विद्यार्थिनींनी सादर केलेला डान्स. शिक्षिका वैशाली सोनवणे यांनी बसवलेल्या एका सुंदर गीतावर मुलींनी बहारदार नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या सादरीकरणातून सावित्रीबाईंच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेश रणशूर, वाल्मीक मोरे, शंकर रणशूर,दत्ता पवार,अंगणवाडी सेविका वनिताताई चौधरी,मदतनीस माधुरी नन्नवरे,सविता पगारे, वर्षा जाधव, सुनिता पोपळघट, सरला मोरे, अश्विनी जाधव, ज्योती चंदनशिव, रंजना चंदनशिव, वत्सलबाई सुरे, उर्मिला चव्हाण, प्रियंका जाधव, सुनिता भंडारी, नारायण वहाडण, सचिन चौधरी, दत्तू वाघ, संदिप थोरात, राकेश रणशूर, गौरी चंदनशिव, तसेच प्रियंका चंदनशिव आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक नवनाथ सूर्यवंशी यांनी सर्वांचे आभार मानले. शाळेत राबवल्या जाणाऱ्या या उपक्रमाचे आणि विद्यार्थिनींच्या कौशल्याचे सरपंच वरुणाताई चौधरी व दिपक चौधरी यांनी विशेष कौतुक केले आहे.

Wednesday, 3 December 2025

जागतिक दिव्यांग दिन'

 ​जि. प. शाळा धारणगाव येथे 'जागतिक दिव्यांग दिन' उत्साहात साजरा; दिव्यांग विद्यार्थ्यांचा लेखन साहित्य देऊन विशेष सन्मान

​धारणगाव (प्रतिनिधी):

येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 'जागतिक दिव्यांग दिन' अत्यंत उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला असून, सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.

​समाजातील दिव्यांग व्यक्तींप्रती आदर आणि समानतेची भावना मुलांमध्ये रुजवण्यसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  या विशेष दिनाचे औचित्य साधून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. तसेच, शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी त्यांना विशेषत्वाने खाऊ आणि शैक्षणिक साहित्य (लेखन साहित्य) देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

​कार्यक्रमात शिक्षिका  वैशाली सोनवणे यांनी पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांसाठी विविध मनोरंजक खेळांचे आयोजन केले होते. यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी आनंदाने सहभाग नोंदवला, ज्यामुळे शाळेच्या परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. खेळांच्या माध्यमातून मुलांमध्ये एकी आणि सहकार्याची भावना वाढीस लागली.

​यावेळी मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक सूर्यवंशी यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. आपल्या भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी  जगातील अनेक यशस्वी दिव्यांग व्यक्तींची उदाहरणे दिली. "शारीरिक उणीव हे अपयश नसून, जिद्दीच्या जोरावर कोणीही यशाला गवसणी घालू शकतो," असे प्रतिपादन त्यांनी केले.

​कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि नियोजन शाळेतील शिक्षक वृंदाने केले. या उपक्रमामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले.


सार्वमत वर्तमानपत्राचे धन्यवाद


 

शाळा वर्धापन दिन व माजी विद्यार्थी मेळावा