Saturday, 19 October 2019
Friday, 18 October 2019
दिपावली सुट्टीच्या पूर्वसंध्येला...
https://youtu.be/3GjYayxC8gI
*🎇"दिपावली सुट्टीच्या पूर्वसंध्येला...."🎇*
www.shikshandhara.com
*Z.P.PRI. SCHOOL HARISON BRANCH*
*TAL-KOPARGAON,DIST-A,NAGAR*

Thursday, 17 October 2019
Monday, 14 October 2019
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
*हॕरिसन ब्रँच शाळेत डॉ.अब्दुल कलाम यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी..*
📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖
📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖
*वाचन प्रेरणा दिन व जागतिक हात धुवा दिन*
*भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंती दिनानिमित्त आज जिल्हा परिषद हॅरिसन ब्रँच शाळेत ‘वाचन प्रेरणा दिन’कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मुख्याध्यापक श्री.सूर्यवंशी सर यांनी वाचनाचे महत्व सांगून डॉक्टर ए.पी.जे.अब्दुल कलामांची यांच्या जीवनविषयी विद्यार्थ्यांना परिपूर्ण माहिती करून दिली.त्यांच्या जयंतीनिमित्त "विद्यार्थ्यानी वाचनाचे महत्व जाणून दररोज मधल्या सुट्टीत व घरी मोकळ्या वेळेत जास्तीत जास्त अवांतर वाचनाची पुस्तके वाचण्याचा संकल्प केला.वाचनाने मनुष्याच्या जीवनात बौद्धिक व सामाजिक परिवर्तन घडून येते.तसेच आपले विचार प्रगल्भ होतात.अंध व्यक्ती वाचू शकत नाही,त्यांच्या साठी ब्रेल लिपीत पुस्तके उपलब्ध आहेत.ते बोटांच्या स्पर्शाने वाचू शकतात.अंध व्यक्तींसाठी विशेष शाळा असतात.त्यांना त्या ठिकाणी शिक्षण उपलब्ध करून दिले जाते.अंध,अपंग व्यक्तींना वेळोवेळी अडचणीच्या प्रसंगी मदत केली पाहीजे.आपल्याला जन्मतःच असलेल्या अवयवांची आपण काळजी घेतली पाहीजे.आपले शरीर स्वच्छ ठेवावे..."असे मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांकडून वरील विचार आचरणात आणण्याची प्रतिज्ञा करून घेण्यात आली.विद्यार्थी व शिक्षकांनी एक तास गोष्टीचे व अवांतर वाचनाची पुस्तके वाचली.त्यानंतर इयत्ता तिसरीचा विद्यार्थी इरशान शेख याने आवडलेल्या "चांगल्या सवयी" या पुस्तकाचे प्रकट वाचन करून दाखवले..*
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
*तसेच जागतिक हात धुवा दिनानिमित्त विद्यार्थ्यांना तसेच महिला पालकांना हात धुण्याचे प्रात्यक्षिक श्रीम.मनिषा शिंपी मॅडम यांनी करून दाखविले व जेवणापूर्वी,शौचाहून आल्यानंतर,बाळाची शी धुतल्यानंतर तसेच स्वयंपाकापूर्वी आपले हात साबणाने किंवा राखेने स्वच्छ धुवावेत अशा प्रकारचे स्वच्छतेचे महत्व पटवून दिले.*
☘☘☘☘☘☘☘☘☘🍀☘
*तसेच सर्व विद्यार्थ्यांना डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारीत shortfilm उडाण दाखविण्यात आली.*
*सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री.सूर्यवंशी सर यांनी केले तर श्रीम.शिंपी मनिषा यांनी उपस्थितांचे आभार मानले.यावेळी अंगणवाडी सेविका व मदतनीस, सौ.रंजना दळवी उपस्थित होत्या.*
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
*मुख्याध्यापक व शिक्षक*
*जि.प.प्राथ.शाळा हॕरिसन ब्रँच*
*ता-कोपरगाव,जि-अ,नगर*
harisgonbranch.blogspot.com

Thursday, 10 October 2019
Wednesday, 9 October 2019
जागतिक टपाल दिन - पत्रास कारण की......
*जागतिक टपाल दिनानिमित्त पत्रास कारण की.....*
*कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी गावातील जि.प.प्राथमिक शाळा हॕरिसन ब्रँच शाळेत जागतिक टपाल दिनानिमित्त "पत्रास कारण की......मतदान जनजागृती" हा उपक्रम राबविण्यात आला.*
*सदर उपक्रमातंर्गत मतदान जनजागृती घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षक या स्पर्धेत सहभागी झाले होते.पोस्टकार्डवर मतदान जनजागृती विषयी सुंदर हस्ताक्षरात घोषवाक्ये लिहून सदर पोस्टकार्ड आपल्या पाहुण्यांना काका,मावशी,आत्या व मामा यांना पाठवले जाणार आहे. याद्वारे हॕरिसन ब्रँच शाळेतील चिमुकले विद्यार्थी मतदानाचा हक्क बजावण्याचा आग्रह आपल्या पाहूण्यांना व नातेवाईकांना करत आहे.*
*"पूर्वीच्या काळी निरोप पोहचविण्यास किंवा खुशाली विचारण्यास पोस्टातील पत्रांचा वापर केला जात होता.आधुनिक युगात सोशल मिडियामुळे जग अगदी जवळ आले आहे.मोबाईलच्या जमाण्यात लोकांना पत्राचा विसर पडला आहे.म्हणून आज जागतिक टपाल दिनाचे औचित्य साधून हॕरिसन ब्रँच शाळेने मतदान जागृती करण्याच्या उद्देशाने पोस्टकार्ड चा उपयोग केला."असे शाळेचे शिक्षक नवनाथ सुर्यवंशी यांनी सांगितले.*
*सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहशिक्षिका मनिषा शिंपी यांनी केले.यावेळी जेऊर कुंभारी गावातील डाक कार्यालयाचे ब्रँच पोस्टमास्तर राजेंद्र सोनवणे यांनी शाळेच्या या उपक्रमास मोफत पोस्टकार्ड उपलब्ध करून दिले.तसेच विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले.यावेळी चांदेकसारे केंद्राचे केंद्रप्रमुख दिलीपराव ढेपले,डाक कार्यालयाचे जीडीएसडीए भगवान डोले,अंगणवाडी सेविका तारा वक्ते व मदतनीस नळे उपस्थित होत्या.सदर कार्यक्रमाचा समारोप उपस्थितांचे आभार मानून शिक्षिका मनिषा शिंपी यांनी केला.*

Saturday, 5 October 2019
मतदान जनजागृती २०१९/२०
https://youtu.be/QUC6UHLxCtk
*शालेय मंत्रिमंडळ निवडणूकीसाठी Evm चा वापर*
---------------------------------------
*शालेय मंत्रिमंडळ निवडणूकीसाठी Evm चा वापर झालात ना चकीत! हो हे खरे आहे.कोपरगाव तालूक्यातील जेऊर कुंभारी गावातील (यादीभाग१७६)हॕरिसन ब्रँचच्या जिल्हा परिषद शाळेत नुकतीच शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक झाली.निमित्त होते येत्या विधानसभा निवडणूकीत(२१ अॉक्टोंबर)मतदारांनी आपला हक्क लक्षात घेऊन १००% मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन मतदान करावे,म्हणून जनजागृती....या निवडणूकीत शाळेतील शिक्षक श्री.नवनाथ सुर्यवंशी सर यांनी Voting macine या ॲन्ड्राॕईड ॲपचा वापर करून टॕबच्या सहाय्याने मतदान घेतले.*
*आपला भारत देश हा लोकशाहीप्रधान देश आहे.आपल्या देशापासून तर गावापर्यंतचा कारभार पाहण्यासाठी जनतेतून लोकप्रतिनिधी निवडणूक प्रक्रिया राबवून निवडून दिलेले असतात.हॕरिसन ब्रँच शाळेत एकूण ६ पदासाठी ही निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली.निवडणूकीच्या आदल्या दिवशी ॲपमध्ये नामनिर्देशन फॉर्म भरून घेऊन उमेदवारांची नावे नोंदविण्यात आले.निवडणूकीतून माघार घेण्याची वेळही देण्यात आली.प्रचाराला जोरात सुरुवात झाली.अखेर सायंकाळी उद्याच्या मतदानाची वेळ स.९.०० ची ठरविण्यात आली.*
*निवडणूकीच्या दिवशी शाळा शनिवारी सकाळी असल्याने ठिक ८.३० मिनिटांनी Mock Poll सर्व उमेदवार व उमेदवार प्रतिनिधी समोर घेण्यात आले.यावेळी जेऊर कुंभारी गावचे सरपंच सौ.सविताताई दळवी,उपसरपंच श्री.यशवंतराव आव्हाड,केंद्रप्रमुख श्री.दिलीपराव ढेपले,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.शैलेश दळवी,सदस्य श्री.शाम पवार व शिक्षक उपस्थित होते.सदर निवडणूक प्रक्रियेत एकूण सहा जागांसाठी १८ विद्यार्थी उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते.प्रत्येक मतदार सहा जागांसाठी मतदान करत होता.विशेष म्हणजे Ballot बटनही मतदारच दाबत होता,परंतू कोणीही बोगस मतदान किंवा जादा मतदान केले नाही.*
*हॕरिसन ब्रँच शाळेचा पट ४५ असून १००% उपस्थिती दररोज असते.व आज मतदानही १००% झाले.ठिक १० वाजता मतदानाची वेळ संपल्यावर Close बटन दाबून मतदान प्रक्रिया संपली.मतदान अधिकारी,श्री.सुर्यवंशी,श्रीम.शिंपी व श्री.दळवी यांनी Tab व इतर साहित्य निवडणूक निर्णय अधिकारी श्री.दिलीपराव ढेपले साहेब व सहाय्यक निवडणूक अधिकारी श्री.विवेक सोनवणे सर यांच्या ताब्यात दिले.निकालासाठी त्यांनी Result बटन दाबून स्क्रीनवर दिसणारा निकाल प्रत्येक उमेदवाराच्या नावासह अहवाल तयार केला.तोपर्यंत सर्व मतदार विद्यार्थी व उमेदवार विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार व पूरक आहार देण्यात आला.विद्यार्थी उमेदवार चिंतेत दिसत होते.त्यांना निवडणूक निकाल काय लागेल याची प्रतिक्षा होती.जेवण झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या कार्यालयात बोलावून घेण्यात आले.व सर्वांच्या उपस्थितीत केंद्रप्रमुख श्री.दिलीपराव ढेपले साहेब यांनी निवडणूकीचा निकाल जाहिर करण्यास सुरुवात केली.निवडणूक जिंकलेले विद्यार्थी निकाल येताच एकच जल्लोष करत होते.एकूणच काय तर "कहीं खूषी तो कहीं गम" अशी परिस्थिती दिसत होती.सर्व निकाल जाहीर झाल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते निवडून आलेली शाळेची मुख्यमंत्री कु.प्रिया पवार,अभ्यासमंत्री-कु.आरती देवकर,सहलमंत्री-चि.अनिकेत सोनवणे,शिस्तमंत्री-चि.प्रणव पवार,आरोग्यमंत्री - चि.कृष्णा पवार व स्वच्छतामंत्री - चि.कुणाल दळवी या सर्वांचा पेन व गुलाबपुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.*
*यावेळी विद्यार्थ्यांच्या पालकांकडून मतदान संकल्पपत्र भरून घेण्यात आले..व येत्या विधानसभा निवडणूकीत १००% सर्व पात्र मतदार बंधू-भगिनींनी मतदानाचा हक्क बजावण्याची शपथ घेतली..*
*सदर निवडणूक प्रक्रीया जेऊर कुंभारी गावच्या सरपंच सौ.सविताताई दळवी,राजेंद्र दळवी व चांदेकसारे केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.दिलीपराव ढेपले यांच्या देखरेखीखाली पार पडली.यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.शैलेश दळवी,श्री.शाम पवार,श्री.साईनाथ जाधव व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. निवडणूक प्रक्रियेनंतर उपस्थित सर्वांचे आभार शिक्षिका श्रीम.मनिषा शिंपी यांनी मानले.*
☘☘☘☘☘☘☘☘☘☘
*NAVNATH SURYAWANSHI*
*HARISON BRANCH,KOPARGAON*
*DIST - A,NAGAR*

Subscribe to:
Posts (Atom)