Welcome



वेबसाईट निर्मिती श्री.नवनाथ सुर्यवंशी सर

Wednesday, 30 January 2019

Chain Drill Game

🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹
           *SHIKSHAN DHARA*

    *Chain Drill Game..............*
       
  *we just  played with my student for a just conversation in english........& now we play this conversation like a  game in camera and create a beautiful video...plz touch the blue line and see this video..*👇

https://youtu.be/jfaUE7j5AIc
🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹
*Plz see this post on our blog 👉harisonbranch.blogspot.com*

Tuesday, 29 January 2019

हुतात्मा दिन राष्ट्रपिता म.गांधी स्मृतीदिन

*_☘🌹☘ज्ञानधारा☘🌹☘_*

*हुतात्मा दिन व राष्ट्रपिता महात्मा गांधी स्मृतिदिन*

📚📚📚📚📚📚📚📚📚
*शब्दांकन - श्री.नवनाथ सुर्यवंशी सर*
*शाळा - जि.प.प्रा.शाळा हॕरिसन ब्रँच*
*ता-कोपरगाव,जि-अहमदनगर*
*मो.नं. ८३०८२०७८८२*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
*दिव्यत्वाची जिथे प्रचिती*
         *तिथे कर माझे जुळती*
*आज हॕरिसन ब्रँच शाळेत👇*
*आपल्या देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिलेल्या क्रांतिकारक,थोर नेते व शहिद जवानांना २ मिनिटे मौन पाळून आजच्या हुतात्मा दिनी श्रद्धांजली वाहण्यात आली.*
    *तसेच सत्य व अंहिसा या तत्वांचा पुरस्कार करणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतीदिनी त्यांना वंदन करुन त्यांच्या स्वावलंबन,सत्य,दृढनिश्चय व अहिंसा या गुणांचे वर्णन करणारं मार्गदर्शन श्री.सुर्यवंशी सर यांनी केले..विद्यार्थ्यांना त्यांच्या लहानपणीच्या आठवणी एका अॉडीओ क्लिपद्वारे ऐकविण्यात आल्या..यावेळी विद्यार्थ्यांनी टेबल(पाढे)पाठ करण्याचा दृढनिश्चय केला.सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीम.शिंपी मॕडम यांनी केले.*

☘🌹☘🌹☘🌹☘🌹☘🌹
*वरील पोस्ट harisonbranch.blogspot.com या ब्लॉगवरसुद्धा वाचायला मिळेल....*

Saturday, 26 January 2019

७० वा प्रजासत्ताक दिन

*_☘🌹☘ज्ञानधारा☘🌹☘_*

*७० वा प्रजासत्ताक दिन @ हॕरिसन ब्रँच*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*शब्दांकन-श्री.नवनाथ सुर्यवंशी सर*
*शाळा - जि.प.प्रा.शाळा हॕरिसन ब्रँच*
*ता-कोपरगाव,जि-अहमदनगर*
*मो.नं. ८३०८२०७८८२*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*निशाण फडकत राही*
         *निशाण झळकत राही*
*देशभक्तीचे गीत आमुचे*
          *दुनियात निनादत राही.*
*७० वा प्रजासत्ताक दिन सोहळा आमच्या हॕरिसन ब्रँच शाळेत मोठ्या दिमाखात संपन्न झाला..कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त शिक्षक श्री.वक्ते सर हे होते.*
*ध्वजाचे पूजन श्री.वक्ते सर,श्री.यशवंत आव्हाड(उपसरपंच जेऊर कुंभारी),श्री.शैलेश दळवी(SMC अध्यक्ष),श्री.शाम पवार(SMC सदस्य),साईनाथ जाधव यांनी केले. मुख्याध्यापक श्री.सूर्यवंशी सर यांनी ध्वजारोहण केले.*
*🎤🎤🎤विद्यार्थ्यांची भाषणे*
*🏆🏆🏆विद्यार्थ्यांना प्रोत्साहन  व कौतुक करण्यासाठी शाळेतर्फे बालआनंद मेळावा स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमुख अतिथींच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप...*
*🖍🖍📙विविध गुणदर्शन स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना श्री.वक्ते सरांकडून कलर पेन्सिल बॉक्स  व वह्यां वाटप*
*🍫🍬🍫ग्रामपंचायत जेऊरीकुंभारी,नारीमंथनचे संपादक श्री.कांदळकर,बद्रीनाथ वाळूंज,साईनाथ जाधव,गणेश पालवे आणि पालकांनी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले.*
*यावेळी शाळाव्यवस्थापन समिती सदस्य,प्रतिष्ठित नागरीक श्री.विजयराव रोहम,रोहित वक्ते आणि बहुसंख्येने पालक व ग्रामस्थ उपस्थित होते..*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*सदर पोस्ट शाळेच्या  harisonbranch.blogspot.com या ब्लॉगवरसुद्धा वाचायला मिळेल....*

Wednesday, 23 January 2019

शिष्यवृत्ती स्पेशल .....६)

*_☘🌹☘ज्ञानधारा☘🌹☘_*

*शब्द समुहाबद्दल  एक शब्द (६)*

📚📚📚📚📚📚📚📚📚
*संकलन - श्री.नवनाथ सुर्यवंशी सर*
*शाळा - जि.प.प्रा.शाळा हॕरिसन ब्रँच*
*ता-कोपरगाव,जि-अहमदनगर*
*मो.नं. ८३०८२०७८८२*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

*१) हात मागे आवळून बांधणे - मुसक्या बांधणे*

*२) क्षुद्रवस्तू चोरणारा - काडीचोर*

*३) सुर्याचे दक्षिणेकडे जाणे - दक्षिणायन*

*४) सुर्याचे उत्तरेकडे जाणे - उत्तरायण*

*५) सूर्य उगवल्यानंतर अंथरुणातून उठणारा - सूर्यवंशी*

*६) सुर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर दिसणारा प्रकाश - संधिप्रकाश*

*७) सुर्योदयापूर्वी देवाला करावयाची आरती - काकडआरती*

*८) स्तुती करण्यास अयोग्य - अश्लाघ्य*

*९) शिक्षा करण्याचे यमपुरीतील स्थान - नरक*

*१०) शिल्लक राहिलेले - उर्वरीत*

☘🌹☘🌹☘🌹☘🌹☘🌹
*वरील पोस्ट परिपाठात विद्यार्थ्यांच्या सरावासाठी उपयुक्त आहे.सदर पोस्ट harisonbranch.blogspot.com या ब्लॉगवरसुद्धा वाचायला मिळेल....*

शिष्यवृत्ती स्पेशल....५)

*_☘🌹☘ज्ञानधारा☘🌹☘_*

*शब्द समुहाबद्दल  एक शब्द (५)*

📚📚📚📚📚📚📚📚📚
*संकलन - श्री.नवनाथ सुर्यवंशी सर*
*शाळा - जि.प.प्रा.शाळा हॕरिसन ब्रँच*
*ता-कोपरगाव,जि-अहमदनगर*
*मो.नं. ८३०८२०७८८२*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

*१) राष्ट्राला पित्याप्रमाणे असणारा - राष्ट्रपिता*

*२) लहान मुलांना समजेल असे - बालबोध*

*३) लोकांच्या मताने चाललेले राज्य - प्रजासत्ताक*

*४) वर्तमानपत्र चालवणारा - संपादक*

*५) वजनदार मनुष्य - धेंड*

*६) वाजवीपेक्षा कमी खर्च करणारा - कंजूष*

*७) वाईट आईबापांच्या पोटी चांगली संतती - भांगेमध्ये तुळस*

*८) विशिष्ट हवामानाचा कालखंड - ऋतू*

*९) विहीरीतून पाणी काढणे -शेंदणे*

*१०) शक्य असेल त्याप्रमाणे - यथाशक्ति*

☘🌹☘🌹☘🌹☘🌹☘🌹
*वरील पोस्ट परिपाठात विद्यार्थ्यांच्या सरावासाठी उपयुक्त आहे.सदर पोस्ट harisonbranch.blogspot.com या ब्लॉगवरसुद्धा वाचायला मिळेल....*

शिष्यवृत्ती स्पेशल....४)

*_☘🌹☘ज्ञानधारा☘🌹☘_*

*शब्द समुहाबद्दल  एक शब्द (४)*

📚📚📚📚📚📚📚📚📚
*संकलन - श्री.नवनाथ सुर्यवंशी सर*
*शाळा - जि.प.प्रा.शाळा हॕरिसन ब्रँच*
*ता-कोपरगाव,जि-अहमदनगर*
*मो.नं. ८३०८२०७८८२*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

*१) बंदुकीला जोडलेले लांब धारदार पाते - संगीन*

*२) बारकाईने चौकशी करणारा - चिकित्सक*

*३)'भले होवो' अशी शुभकामना - आशीर्वाद*

*४) भयाने गांजलेली स्थिती - त्राही त्राही*

*५) बोटीवरील मुख्य व्यवस्थापक - कप्तान*

*६) भाकरी करण्याची लाकडी परात - काथवट*

*७) मशाल धरणारा नोकर - माशालजी*

*८) म्हातारपणी बुद्धीला झालेला विकार - म्हातारचळ*

*९) मिजासखोर मनुष्य - तिसमारखाँ*

*१०) योग करण्याची जागा - योगशाळा*

☘🌹☘🌹☘🌹☘🌹☘🌹
*वरील पोस्ट परिपाठात विद्यार्थ्यांच्या सरावासाठी उपयुक्त आहे.सदर पोस्ट harisonbranch.blogspot.com या ब्लॉगवरसुद्धा वाचायला मिळेल....*

शिष्यवृत्ती स्पेशल....३)

*_☘🌹☘ज्ञानधारा☘🌹☘_*

*शब्द समुहाबद्दल  एक शब्द (३)*

📚📚📚📚📚📚📚📚📚
*संकलन - श्री.नवनाथ सुर्यवंशी सर*
*शाळा - जि.प.प्रा.शाळा हॕरिसन ब्रँच*
*ता-कोपरगाव,जि-अहमदनगर*
*मो.नं. ८३०८२०७८८२*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

*१) नदीच्या दोन्ही बाजूंचा सुपीक प्रदेश - खोरे*

*२) नेहमी न दिसणारी गोष्ट - दुर्मिळ*

*३) पृथ्वीच्या मध्यबिंदूकडे ओढले जाणे - गुरूत्वाकर्षण*

*४) पहाटेची वेळ - उषःकाल*

*५) पहाटेचा पवित्र काळ - रामाप्रहर*

*६) पायदळी तुडविलेले - पददलित*

*७) पापापासून मुक्तता - पापक्षालन*

*८) पायात घालावयाचा विजयाचा तोडा - आकण*

*९) पावसापासून निवारण करण्यासाठी केलेले झाडपाल्याचे आवरण - इरले*

*१०) पूर्वी घडलेल्या हकीकतीचे वर्णन - इतिहास*

☘🌹☘🌹☘🌹☘🌹☘🌹
*वरील पोस्ट परिपाठात विद्यार्थ्यांच्या सरावासाठी उपयुक्त आहे.सदर पोस्ट harisonbranch.blogspot.com या ब्लॉगवरसुद्धा वाचायला मिळेल....*

शिष्यवृत्ती स्पेशल....२)

*_☘🌹☘ज्ञानधारा☘🌹☘_*

*शब्द समुहाबद्दल  एक शब्द (२)*

📚📚📚📚📚📚📚📚📚
*संकलन - श्री.नवनाथ सुर्यवंशी सर*
*शाळा - जि.प.प्रा.शाळा हॕरिसन ब्रँच*
*ता-कोपरगाव,जि-अहमदनगर*
*मो.नं. ८३०८२०७८८२*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

*१) जिल्ह्याचा कारभार पाहणारी संस्था - जिल्हा परिषद*

*२) जिवाला जीव देणारा - जिवलग*

*३) जे नाही ते आहे असे वाटणे - आभास*

*४) जो इतरांशी मिसळून वागत नाही असा - तिरशिंगराव,चिडखोर माणूस*

*५) तिथी,वार,नक्षत्र,योग यांची माहिती आसलेली पुस्तिका - पंचांग*

*६) तेज नसलेली अवस्था - अवकळा*

*७) तोंडावर हात मारीत काढलेला आवाज - बोंब*

*८) दुसऱ्याच्या ताब्यात असलेला - अंकीत*

*९) दुसरा धर्म स्विकारणे - धर्मांतर*

*१०) दुसऱ्यास न दिसणारे काम - चोरकाम*

☘🌹☘🌹☘🌹☘🌹☘🌹
*वरील पोस्ट परिपाठात विद्यार्थ्यांच्या सरावासाठी उपयुक्त आहे.सदर पोस्ट harisonbranch.blogspot.com या ब्लॉगवरसुद्धा वाचायला मिळेल....*

शिष्यवृत्ती स्पेशल....१)

*_☘🌹☘ज्ञानधारा☘🌹☘_*

*शब्द समुहाबद्दल  एक शब्द (१)*

📚📚📚📚📚📚📚📚📚
*संकलन - श्री.नवनाथ सुर्यवंशी सर*
*शाळा - जि.प.प्रा.शाळा हॕरिसन ब्रँच*
*ता-कोपरगाव,जि-अहमदनगर*
*मो.नं. ८३०८२०७८८२*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

*१) आगाऊ खर्चासाठी दिलेली रक्कम - अनामत*

*२) उतारुनी थांबण्याची जागा - प्रतिक्षालय*

*३) एकाच काळातील - समकालीन*

*४) एक लाभदर्शक धार्मिक प्रतिक - स्वस्तिक*

*५)कड्यावरुन लोटण्याची शिक्षा  - कडेलोट*

*६) कुणालाच दाद न देणारा - वस्ताद*

*७) खाद्य पेयाचे नियमाने ठरलेले प्रमाण - रतीब*

*८) चिखलात उगवलेले कमळ - पंकज*

*९)जवळचा प्रदेश - परिसर*

*१०) जवळ भांडवल नसताना मोठे व्यापारी आहोत असा बहाणा करणारा लहान शेठ - तिरकमशेठ*

☘🌹☘🌹☘🌹☘🌹☘🌹
*वरील पोस्ट परिपाठात विद्यार्थ्यांच्या सरावासाठी उपयुक्त आहे.सदर पोस्ट harisonbranch.blogspot.com या ब्लॉगवरसुद्धा वाचायला मिळेल....*

लेक शिकवा अभियान @ Harison Branch

☘🍁☘🍁☘🍁☘🍁☘🍁
*राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्सव*
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
       *जि.प.प्राथमिक शाळा हॕरिसन ब्रँच*

*"आपले नाव मोठे करण्यापेक्षा,राष्ट्राचे नाव मोठे करावे" अशा उच्च विचारांच्या राजमाता जिजाऊ...*

*आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान,चारित्र्य,चातुर्य,संघटन व पराक्रम अशा राजस व सत्वगुणांचे बाळकडू देणाऱ्या राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा जयंती उत्सव व "उठा जागे व्हा आणि आपले ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका." असा संदेश देणारे युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद ....*
*या थोर महापुरुषांची जयंतीउत्सव आज Harison Branch शाळेत साजरा करण्यात आला...*
🧖‍♀🧚‍♀🧖‍♀🧚‍♀🧖‍♀🧚‍♀🧖‍♀🧚‍♀🧖‍♀🧚‍♀🧖‍♀

*तसेच "लेक वाचवा लेक शिकवा" अभियानांतर्गत Good touch,Bad touch या
विषयावर कोमल हा लघुपट विद्यार्थ्यांना दाखवण्यात आला...*
☘🍁☘🍁🍁🍁☘🍁☘🍁☘
              *मुख्याध्यापक व सर्व शिक्षक*
               *शाळा व्यवस्थापन समिती*
           *जि.प.प्राथ.शाळा हॕरिसन ब्रँच*

Tuesday, 8 January 2019

केंद्रस्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धा

☘🍁☘🍁☘🍁☘🍁☘🍁☘
   *केंद्रस्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धा*
*केंद्र-चांदेकसारे,ता-कोपरगाव,जि-अ,नगर*
🍁☘🍁☘🍁☘🍁☘🍁☘🍁
*दि.२ जानेवारीला झालेल्या केंद्रस्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत हॕरिसन ब्रँच शाळेतील विद्यार्थ्यांचे उत्तुंग यश...*
🏅🥇🏅🥇🏅🥇🏅🥇🏅🥇🏅
👉 *वेशभूषा स्पर्धा - लहान गट*
*प्रथम क्रमांक - चि.कृष्णा शेळके*

👉 *वेशभूषा स्पर्धा - मध्यम गट*
*प्रथम क्रमांक - कु.साक्षी त्रिभुवन*

👉 *वक्तृत्व स्पर्धा - मध्यम गट*
*प्रथम क्रमांक - कु.प्रिया पवार*

👉 *सांस्कृतिक स्पर्धा - मध्यम गट*
*तृतीय क्रमांक - नाटीका - हुंडाबंदी*

*मार्गदर्शन - श्रीम.मनिषा शिंपी मॕडम*
🏅🥇🏅🥇🏅🥇🏅🥇🏅🥇🏅
*सदर यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे केंद्रप्रमुख श्री.दिलीपराव ढेपले,सेवानिवृत्त शिक्षक व मार्गदर्शक श्री.वक्ते सर यांनी अभिनंदन केले...श्री.वक्ते सर यांनी आज लेक शिकवा अभियानाचे औचित्य साधून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना  बक्षीस म्हणून लेखन साहित्य २६ जानेवारीला देण्याचे जाहीर केले व साहित्य घेण्यासाठी रोख रक्कम मुख्याध्यापक श्री.सूर्यवंशी सर यांच्याकडे सुपूर्द केली..*
🍁☘🍁☘🍁☘🍁☘🍁☘🍁
             *मुख्याध्यापक व शिक्षक*
     *जि.प.प्राथमिक शाळा हॕरिसन ब्रँच*
            *अध्यक्ष व सर्व सदस्य*
*शाळा व्यवस्थापन समिती हॕरिसन ब्रँच*