Welcome

वेबसाईट निर्मिती श्री.नवनाथ सुर्यवंशी सर

Saturday, 29 June 2019

Send your name to mars

https://mars.nasa.gov/participate/send-your-name/mars2020/certificate/110939649334

*अमेरिकेच्या National Aeronautics & Space Administration अर्थात 'नासा' या जगतविख्यात अवकाश संशोधन करणाऱ्या संस्थेचे 'मंगळ रोव्हर 2020' हे अंतरिक्षयान 'लाला ग्रह' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंगळाच्या दिशेने झेपावणार आहे ,या अंतरिक्ष यानाबरोबर स्टेनसील्ड चिपवर आपली नावे पाठवून मानवी इतिहासातील दुसऱ्या ग्रहावर आपल्या पाऊल खुणा सोडण्याची ऐतिहासिक संधी नासाच्यावतीने जगभरातील सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करून दिली आहे.ही मोहीम नासाच्या वतीने चंद्र मोहीम ते मंगळ मोहीमेच्या प्रवासापर्यंतच्या मिशनला उद्देशून सार्वजनिक सहभाग मोहीम अंतर्गत राबवत आहेत*
*विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन  निर्माण होण्यासाठी सर्व शाळा,महाविद्यालये यात सहभागी होत आहेत..चला तर माग वरील link मध्ये आपल्या विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे नावे नोंदवून या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होऊया.....*
🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀
*सदर उपक्रमाबद्दल अधिक माहिती harisonbranch.blogspot.com या आमच्या  शाळेच्या blog वर वाचू शकता..*

Friday, 28 June 2019

ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार....

*🛸🛸गोपाळवाडीबरोबर हरिसन ब्रँचच्या शाळेतील मुलांची नावेही जाणार मंगळ ग्रहावर🛸🛸*
*जि.प.प्राथमिक शाळा हॕरिसन ब्रँच*
🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀
*इ.५ वीचा परिसर अभ्यास भाग - १*
🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍
*धडा १ ला - आपली पृथ्वी व आपली सुर्यमाला*
🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍
*आज इ. ५ वीचा प.अ.चा धडा शिकवताना अवकाश स्थानकात वास्तव्य करणारे पहिले भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा यांची ओळख करुन देत असताना...सकाळ वर्तमानपत्रात आलेली "गोपाळवाडीच्या पोरांची नावे पोहचणार मंगळावर" ही बातमी वाचली होती.त्याच दिवशी आमच्या हरिसन ब्रँच शाळेच्या ४४ विद्यार्थी व दोन शिक्षकांची नावे ही आम्ही नोंदवली होती.त्याची माहिती आज शिकवताना विद्यार्थ्यांना सांगितल्यावर विद्यार्थ्यांचे अधिकच कुतूहल जागृत झाले..त्यांना याबाबत अधिक सखोल माहिती देण्यासाठी youtube च्या सहाय्याने मंगळग्रहावर यान कशापद्धतीने उतरवले जाते..त्याठिकाणी कशा पद्धतीने मनुष्यविरहीत यंत्राच्या माध्यमातून संशोधन केले जाते याबाबतचे व्हिडीओ दाखवले..*

*👇मंगळ ग्रहावर नावे पाठवण्याबाबत...थोडक्यात माहिती(नारायण मंगलारम सरांच्या ब्लॉगवरून)👇*

*अमेरिकेच्या National Aeronautics & Space Administration अर्थात 'नासा' या जगतविख्यात अवकाश संशोधन करणाऱ्या संस्थेचे 'मंगळ रोव्हर 2020' हे अंतरिक्षयान 'लाला ग्रह' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंगळाच्या दिशेने झेपावणार आहे ,या अंतरिक्ष यानाबरोबर स्टेनसील्ड चिपवर आपली नावे पाठवून मानवी इतिहासातील दुसऱ्या ग्रहावर आपल्या पाऊल खुणा सोडण्याची ऐतिहासिक संधी नासाच्यावतीने जगभरातील सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करून दिली आहे.ही मोहीम नासाच्या वतीने चंद्र मोहीम ते मंगळ मोहीमेच्या प्रवासापर्यंतच्या मिशनला उद्देशून सार्वजनिक सहभाग मोहीम अंतर्गत राबवत आहेत*
            *नासाच्या पसाडेना ,कॅलिफोर्निया येथील जेट प्रोपुलशन लॅबोरेटरीतल्या ( JPL ) मायक्रोडिव्हायसेस लॅबोरेटरी मध्ये इलेक्ट्रॉनिक बीमचा वापर करून सिलिकॉनच्या चिप वर मानवी केसाच्या एक हजाराव्या भागाइतक्या ( 75 नॅनोमिटर ) रुंदीत आपण नोंदवलेली नावे स्टेन्सिल केली जाणार आहेत. इतक्या छोट्या आकारात एक डेमी आकाराच्या चिपवर दहा लाख नावे मावतील. ह्या चिप रोव्हर वर काचेच्या* *आवरणाखाली जतन करून मंगळावर पाठवल्या जातील.*
         *"या ऐतिहासिक मंगळ अभियानासाठी रोव्हर तयारी करत असताना ,सर्वजण या नव्या मोहिमेत सामील व्हावेत ,सर्वाना याची माहिती व्हावी असे आम्हाला वाटते " असे नासाच्या वॉशिंग्टन येथील 'सायन्स मिशनचे डारेक्टरेट' (SMD) थॉमस झुरबुचेन म्हणाले.त्याअंतर्गत आमच्या जि प शाळा हरिसन ब्रँचचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी शाळेतील पहिली ते पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांची तसेच शिक्षक व शाळेचेही नावे या उपक्रमासाठी नोंदवले होती ,त्याची ऑनलाईन आलेले बोर्डिंग पासचे वाटप शाळेत करण्यात येणार आहे.*
🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀