Thursday, 20 February 2020
शिवजयंती.......
*हॕरिसन ब्रँच शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी...*
कोपरगाव तालुक्यातील जि.प.शाळा हॕरिसन ब्रँच शाळेत छत्रपती शिवाजी माहाराजांची ३९० वी जयंती उत्साहात साजरी झाली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षिका मनिषा शिंपी तर प्रमुख पाहुणे साईनाथ जाधव,राजेंद्र दळवी हे होते.
शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन बालसभेला सुरुवात करण्यात आली.परस्त्रीला मातेसमान वागणूक देणारा लोककल्याणकारी राजाच्या आचरणातून काही बोध आजच्या तरुण पिढीने घेतला पाहीजे.तसेच शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा इतिहास शाळेचे मुख्याध्यापक नवनाथ सुर्यवंशी यांनी मुलांना सांगितला.
यावेळी शाळेतील साक्षी त्रिभुवन,सेजल पवार,प्रिया पवार,अनिकेत सोनवणे,आर्यन मैंद,शेळके कृष्णा,पवार कृष्णा,पूनम मोरे या विद्यार्थ्यांची भाषणे झाली.
स्वराज्यातील रयतेची काळजी घेऊन लोककल्याणकारी कार्य करणाऱ्या शिवाजी राजाने वृक्ष संवर्धन,जलव्यवस्थापनाची कामे उत्कृष्ट पणे त्याकाळी हाती घेतली होती.आता आपणही वृक्ष लागवडीचे व पाण्याचे महत्व ध्यानात घेऊन नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन केले पाहीजे.असा मोलाचा संदेश शाळेतील शिक्षिका मनिषा शिंपी यांनी दिला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नवनाथ सुर्यवंशी व आभार मनिषा शिंपी यांनी मानले.

Tuesday, 18 February 2020
लेखक आपल्या भेटीला.....
*पाठ्यपुस्तकातील धड्यांचे लेखकच जेव्हां विद्यार्थ्यांशी संवाद साधतात....*
लेखक आपल्या भेटीला या उपक्रमांतर्गत आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हॕरिसन ब्रँच शाळेतील विद्यार्थ्यांनी इयत्ता ४ थी बालभारती पुस्तकातील 'मिठाचा शोध'या धड्याच्या लेखिका अंजलीताई अत्रे यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे संवाद साधला.
लेखिका अंजलीताई यांनी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची अगदी दिलखुलास पणे उत्तरे दिली.त्यांनी विद्यार्थ्यांना बोधपरअशा तीन कथा सांगितल्या.मधमाशी मध कशाप्रकारे गोळा करतात.कृत्रिमरित्या मधाचे संकलन कशे केले जाते.याबद्दल सविस्तर माहिती अंजलीताईंनी विद्यार्थ्यांना दिली.तसेच मोबाईल व टि.व्ही.मुळे डोळ्यांवर काय परिणाम होतात.त्याचे आपल्या शरीरावर अवयवांवर काय परिणाम होतात.याची सखोल माहिती विद्यार्थ्यांना दिली.व विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून दिले.तसेच उघड्यावरचे पदार्थ खाऊ नये,स्वच्छतेचे सहा संदेश गोष्टीरुपाने विद्यार्थ्यांना सांगितले.
असं म्हणतात मुले ही देवाघरची फुले असतात म्हणून मी जरी शिक्षिका नसले तरी मला मुलांमध्ये रमायला व त्यांच्याशी गप्पा मारायला व गोष्टी सांगायला खूप आवडते.अगदी असंच आज त्यांच्याबरोबर संवाद साधताना आम्हा विद्यार्थी व शिक्षकांना वाटत होतं.आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांशी गप्पा व मूल्यवर्धक गोष्टी सांगण्यासाठी मी पून्हा येईलं...असे म्हणून विद्यार्थी व शिक्षकांचा अंजलीताईंनी निरोप घेतला.शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या खास शैलीत टाळ्या वाजवून अंजलीताईंचे आभार मानले.
सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षिका मनिषा शिंपी यांनी केले. तसेच आभार मुख्याध्यापक नवनाथ सूर्यवंशी यांनी मानले.हॕरिसन ब्रँच शाळेत विद्यार्थी विकासासाठी सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात.आजचा उपक्रमही कौतुकास्पद असा आहे असे गौरवोद्गार केंद्रप्रमुख दिलीपराव ढेपले यांनी आपल्या शुभेच्छा संदेशातून दिला.

Friday, 7 February 2020
Wednesday, 5 February 2020
Subscribe to:
Posts (Atom)