Welcome



वेबसाईट निर्मिती श्री.नवनाथ सुर्यवंशी सर

Thursday, 20 February 2020

शिवजयंती.......

*हॕरिसन ब्रँच शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी...*
     कोपरगाव तालुक्यातील जि.प.शाळा हॕरिसन ब्रँच शाळेत छत्रपती शिवाजी माहाराजांची ३९० वी जयंती उत्साहात साजरी झाली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षिका मनिषा शिंपी तर प्रमुख पाहुणे साईनाथ जाधव,राजेंद्र दळवी हे होते.
         शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन बालसभेला सुरुवात करण्यात आली.परस्त्रीला मातेसमान वागणूक देणारा लोककल्याणकारी राजाच्या आचरणातून काही बोध आजच्या तरुण पिढीने घेतला पाहीजे.तसेच शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा इतिहास शाळेचे मुख्याध्यापक नवनाथ सुर्यवंशी यांनी मुलांना सांगितला.
  यावेळी शाळेतील साक्षी त्रिभुवन,सेजल पवार,प्रिया पवार,अनिकेत सोनवणे,आर्यन मैंद,शेळके कृष्णा,पवार कृष्णा,पूनम मोरे या विद्यार्थ्यांची भाषणे झाली.
        स्वराज्यातील रयतेची काळजी घेऊन लोककल्याणकारी कार्य करणाऱ्या शिवाजी राजाने वृक्ष संवर्धन,जलव्यवस्थापनाची कामे उत्कृष्ट पणे त्याकाळी हाती घेतली होती.आता आपणही वृक्ष लागवडीचे व पाण्याचे महत्व ध्यानात घेऊन नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन केले पाहीजे.असा मोलाचा संदेश शाळेतील शिक्षिका मनिषा शिंपी यांनी दिला.
     कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नवनाथ सुर्यवंशी व आभार मनिषा शिंपी यांनी मानले.

No comments:

Post a Comment