संत ज्ञानेश्वरांनी पसायदानातली एक ओळ आठवते..
*जो जे वांछिल तो ते लाहो | प्राणिजात ||*
सर्व प्राणीमात्र्यांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवोत..ते जे मागतील ते त्यांना सर्व मिळो..परंतू सर्वांनाच आपल्या इच्छेप्रमाणे मिळेलच असे नाही.काहींना वडीलोपार्जित मिळालेले असते,काहींनी कष्ट करून,काहींनी भ्रष्ट मार्गाने,तर काहींनी भिक मागून परंतू आपल्या समाजात अशाही काही व्यक्ती आहेत ज्यांच्याजवळ काहीच नाही,भिकही मागत नाहीत....अशा व्यक्तींना माणुसकीच्या भावनेने पाहून मदत करणे खरोखरच गरजेचे आहे.
आपल्या भारतात 🎆🎆दिवाळी 🌆🌆हा सण घरोघरी मोठ्या उत्साहाणे साजरा केला जातो..
परंतू समाजात अशा काही व्यक्ती आहेत ज्यांना सण वार माहितही नसतात व त्यांचा रोजच्या जगण्याशी संघर्ष असतो.का जगतोय??कोणासाठी जगतोय??फक्त जिवंत आहे म्हणून जगतोय??अशा निराधार,मानसिक अपंगत्व,बेघर,मतीमंद,रस्ता चुकलेली अशी नानाविविध प्रकारची आपल्या शहरात,गावात फिरताना दिसतात..
मला तर आमच्या परिसरात दोन व्यक्ती अशा पद्धतीने कायम फिरताने आढळतात...एकदा तर दुकानात मुलांना खाऊ घेत होतो तर *खंडू* तेथे उभा होता.मुलांबरोबर त्यालाही ही खायला घेऊन दिले.परंतु अशा काही उपक्रमांचा विचार मनात आला देखील नव्हता..
🌌🌌खरोखरच दैंनदिन जिवन जगत असताना आपण असा काही विचार करतो का??कोजागिरी काव्य मैफीलीत श्री.सतोष तांदळे सरांनी सदर उपक्रमाची माहिती दिली..घरी दिवाळी सण साजरा करत असताना प्रत्येकाने दिवाळीला बनवलेले फराळाचे पॕकेट लक्ष्मीपूजन झाल्यानंतर आपल्या परिसरात,बस स्थानक,रेल्वे स्थानक,मंदिर परिसरात असलेल्या निराधार बेवारस व्यक्तींना शोधून त्यांच्या पर्यंत पोहचवायचे..त्यांचीही दिवाळी गोड करायची.आदरणीय श्री.हिरालाल महानुभाव सरांनी मागील वर्षी त्यांच्या आईच्या पुण्यतिथीदिनी नवीन ५०ब्लँकेट घेऊन शहरात ज्या ज्या ठिकाणी निराधार व्यक्ती रस्त्यावर ,स्थानकावर झोपलेल्या होत्या त्यांच्या अंगावर ब्लँकेट पांघरूण घालून त्यांना मायेची ऊब दिली.व त्यांची🌅 सकाळ🌅 हासरी केली..
खरोखरच दैनंदिन संसार व नोकरीच्या चाकोरीत अडकलेले आपण आपल्याच सुखदुःखात मश्गुल असतो..परंतू इतरांच्या दुखाःत हळूच मायेची फुंकर घालण्याचे कार्य म सा प च्या कवींनी हाती घेतले..सदर उपक्रमात ह्यावर्षी सहभागी होऊन बोथट झालेल्या आपल्या संवेदना जागृत करुया...🙏🙏
*📝नवनाथ सुर्यवंशी* 📝
*कोपरगाव*