Welcome



वेबसाईट निर्मिती श्री.नवनाथ सुर्यवंशी सर

Thursday, 11 October 2018

दि.९ अॉक्टोबर २०१८ - जागतिक टपाल दिन

*वडीलधार्यांना नमस्कार व घरातील छोट्यांना गोड गोड पापा..*
✉📝✉📝✉📝✉📝✉📝✉
*जागतिक टपाल दिनाचे औचित्य साधून आज जि.प.प्राथमिक शाळा हॕरिसन ब्रँच शाळेच्या विद्यार्थी व शिक्षकांनी जेऊर कुंभारी येथील डाकघराला भेट देऊन टपाल सेवेविषयी अधिक माहिती जाणून घेतली..*
🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊

*कबूतर जा जा..कबूतर जा जा..असे म्हणत चिठ्ठी पाठवणे,तसेच घोड्यावरून विशेष दूतामार्फत निरोप पाठवणे...ही प्रथा कालबाह्य ठरुन टपालसेवेचा जन्म झाला..सध्याच्या युगात तर मोबाईल सेवा व तंत्रज्ञानाच्या वापरामुळे जग आगदी जवळ आले..व टपाल सेवेचा विसरच पडून गेला.सध्याचे चित्र असे आहे की टपाल कार्यालयाऐवजी सर्व व्यवहार मेल व इतर तंत्रज्ञानाचा वापर करून केले जातात.*
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
*आज जि.प.प्राथमिक शाळा हॕरिसन ब्रँच शाळेतील विद्यार्थ्यांना  पोस्टमन श्री.राजेंद्र सोनवणे यांनी टपाल सेवेविषयी सखोल माहिती देऊन विद्यार्थ्यांना खाऊ व पोस्टकार्ड भेट देऊन आपले नातेवाईक व पाहूण्यांना दिपावली शुभेच्छापत्र पाठविण्यास सांगितले...विद्यार्थ्यांनीही आनंदाने पत्र घेऊन पोस्टमन काकांना धन्यवाद दिले...व आपल्या मामाला,मावशीला,इतर नातेवाईकांना पत्र पाठवायचेच असे मनाशी ठरवून...पोस्टमन कांकाचा निरोप घेऊन शाळेच्या दिशेने निघाले...*

No comments:

Post a Comment