Welcome



वेबसाईट निर्मिती श्री.नवनाथ सुर्यवंशी सर

Thursday, 28 November 2019

प्रसार माध्यमांनी घेतली दखल....



कौमी एकता सप्ताह व संविधान दिन

*कौमी एकता सप्ताह व संविधान दिन साजरा...*
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

*चांदेकसारे केंद्रातील जि.प.शाळा हॕरिसन ब्रँच,डाऊच वसाहत मराठी,डाऊच वसाहत ऊर्दू,डाऊच खुर्द या चार शाळांनी संविधान दिन व कौमी एकता सप्ताह निमित्ताने साईबाबा मंदिर डाऊच खुर्द या ठिकाणी जाऊन राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतली.व सामुहीक संविधान म्हणून सर्वधर्मसमभावाचा संदेश दिला.यावेळी निकुंभ सर व थोरात सर यांनी  संविधानाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली.सुर्यवंशी सरांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.तसेच ऊर्दू शाळेचे मुख्याध्यापक मतिन सर यांनी २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद पोलिसांना व जनतेला सर्व विद्यार्थी व शिक्षकांसह श्रद्धांजली वाहीली.सदर ठिकाणी चारही शाळेतील  विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते,कविता,गोष्टी सादर केल्या.जाधव सरांच्या विनोदी गोष्टीने सर्व विद्यार्थी खळखळून हसले.त्यानंतर विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून कार्यक्रमाचा समारोप शिक्षिका जमधडे यांनी केला.*
 *यावेळी शिक्षिका जेबा इनामदार,मनिषा शिंपी,सविता जमधडे व मनिषा बनसोडे उपस्थित होत्या.तसेच शिक्षक धनराज जाधव,मतिन मनियार,अशोक थोरात,सुधाकर निकुंभ व नवनाथ सुर्यवंशी यांनी सदर कार्यक्रम यशस्वी करण्यास विशेष मेहनत घेतली.*

Monday, 18 November 2019

शाळेतील उपक्रमांची वर्तमानपत्रांनी घेतली दखल



१४ नोव्हेंबर बालदिन विशेष कार्यक्रम.....

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

*जि. प. प्रा. शाळा,हॕरिसन ब्रँच*

    *🌹बालदिन विशेष🌹*

🌹 *मतदार जनजागृती पत्रलेखन स्पर्धा प्रमाणपत्र वाटप*

🌹 *हस्तकला स्पर्धा प्रमाणपत्र वाटप*

🌹 *इ.१ ली व २ री मुले प्राणी,फळे ,फुले व क्रिस च्या मुखवट्यासह बालसभेत..*

🌹  *चाचा नेहरू जीवनपट व मुले*
            ( माहिती )

🌹  *सलाम चाचाजी*
          ( माहितीपट )

🌹 *संगीत खुर्ची स्पर्धा*



🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Friday, 18 October 2019

दिपावली सुट्टीच्या पूर्वसंध्येला...

https://youtu.be/3GjYayxC8gI

*🎇"दिपावली सुट्टीच्या पूर्वसंध्येला...."🎇*

        www.shikshandhara.com
*Z.P.PRI. SCHOOL HARISON BRANCH*
      *TAL-KOPARGAON,DIST-A,NAGAR*

Monday, 14 October 2019

🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳

*हॕरिसन ब्रँच शाळेत डॉ.अब्दुल कलाम यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी..*

📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖
📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖
*वाचन प्रेरणा दिन व जागतिक हात धुवा दिन*

*भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंती दिनानिमित्त आज जिल्हा परिषद हॅरिसन ब्रँच शाळेत ‘वाचन प्रेरणा दिन’कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मुख्याध्यापक श्री.सूर्यवंशी सर यांनी वाचनाचे महत्व सांगून डॉक्टर ए.पी.जे.अब्दुल कलामांची यांच्या जीवनविषयी विद्यार्थ्यांना परिपूर्ण माहिती करून दिली.त्यांच्या जयंतीनिमित्त "विद्यार्थ्यानी वाचनाचे महत्व जाणून दररोज मधल्या सुट्टीत व घरी मोकळ्या वेळेत जास्तीत जास्त अवांतर वाचनाची पुस्तके वाचण्याचा संकल्प केला.वाचनाने मनुष्याच्या जीवनात बौद्धिक व सामाजिक परिवर्तन घडून येते.तसेच आपले विचार प्रगल्भ होतात.अंध व्यक्ती वाचू शकत नाही,त्यांच्या साठी ब्रेल लिपीत पुस्तके उपलब्ध आहेत.ते बोटांच्या स्पर्शाने वाचू शकतात.अंध व्यक्तींसाठी विशेष शाळा असतात.त्यांना त्या ठिकाणी शिक्षण उपलब्ध करून दिले जाते.अंध,अपंग व्यक्तींना वेळोवेळी अडचणीच्या प्रसंगी मदत केली पाहीजे.आपल्याला जन्मतःच असलेल्या अवयवांची आपण काळजी घेतली पाहीजे.आपले शरीर स्वच्छ ठेवावे..."असे मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांकडून वरील विचार आचरणात आणण्याची प्रतिज्ञा करून घेण्यात आली.विद्यार्थी व शिक्षकांनी एक तास गोष्टीचे व अवांतर वाचनाची पुस्तके वाचली.त्यानंतर इयत्ता तिसरीचा विद्यार्थी इरशान शेख याने आवडलेल्या "चांगल्या सवयी" या पुस्तकाचे प्रकट वाचन करून दाखवले..*
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
*तसेच जागतिक हात धुवा दिनानिमित्त विद्यार्थ्यांना तसेच महिला पालकांना हात धुण्याचे प्रात्यक्षिक श्रीम.मनिषा शिंपी मॅडम यांनी करून दाखविले व जेवणापूर्वी,शौचाहून आल्यानंतर,बाळाची शी धुतल्यानंतर तसेच स्वयंपाकापूर्वी आपले हात साबणाने किंवा राखेने स्वच्छ धुवावेत अशा प्रकारचे स्वच्छतेचे महत्व पटवून दिले.*
☘☘☘☘☘☘☘☘☘🍀☘
*तसेच सर्व विद्यार्थ्यांना डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारीत shortfilm उडाण दाखविण्यात आली.*

      *सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री.सूर्यवंशी सर यांनी केले तर श्रीम.शिंपी मनिषा यांनी उपस्थितांचे आभार मानले.यावेळी अंगणवाडी सेविका व मदतनीस, सौ.रंजना दळवी  उपस्थित होत्या.*

🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳

          *मुख्याध्यापक व शिक्षक*
        *जि.प.प्राथ.शाळा हॕरिसन ब्रँच*
           *ता-कोपरगाव,जि-अ,नगर*
harisgonbranch.blogspot.com


Wednesday, 9 October 2019

जागतिक टपाल दिन - पत्रास कारण की......

*जागतिक टपाल दिनानिमित्त पत्रास कारण की.....*
           *कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी गावातील जि.प.प्राथमिक शाळा हॕरिसन ब्रँच शाळेत जागतिक टपाल दिनानिमित्त "पत्रास कारण की......मतदान जनजागृती" हा उपक्रम राबविण्यात आला.*
        *सदर उपक्रमातंर्गत मतदान जनजागृती घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षक या स्पर्धेत सहभागी झाले होते.पोस्टकार्डवर मतदान जनजागृती विषयी सुंदर हस्ताक्षरात घोषवाक्ये लिहून सदर पोस्टकार्ड आपल्या पाहुण्यांना काका,मावशी,आत्या व मामा यांना पाठवले जाणार आहे. याद्वारे हॕरिसन ब्रँच शाळेतील चिमुकले विद्यार्थी मतदानाचा हक्क बजावण्याचा आग्रह आपल्या पाहूण्यांना व नातेवाईकांना करत आहे.*
          *"पूर्वीच्या काळी निरोप पोहचविण्यास किंवा खुशाली विचारण्यास पोस्टातील पत्रांचा वापर केला जात होता.आधुनिक युगात सोशल मिडियामुळे जग अगदी जवळ आले आहे.मोबाईलच्या जमाण्यात लोकांना पत्राचा विसर पडला आहे.म्हणून आज जागतिक टपाल दिनाचे औचित्य साधून हॕरिसन ब्रँच शाळेने मतदान जागृती करण्याच्या उद्देशाने पोस्टकार्ड चा उपयोग केला."असे शाळेचे शिक्षक नवनाथ सुर्यवंशी यांनी सांगितले.*
           *सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहशिक्षिका मनिषा शिंपी यांनी केले.यावेळी जेऊर कुंभारी गावातील डाक कार्यालयाचे ब्रँच पोस्टमास्तर राजेंद्र सोनवणे यांनी शाळेच्या या उपक्रमास मोफत पोस्टकार्ड उपलब्ध करून दिले.तसेच विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले.यावेळी चांदेकसारे केंद्राचे केंद्रप्रमुख दिलीपराव ढेपले,डाक कार्यालयाचे जीडीएसडीए भगवान डोले,अंगणवाडी सेविका तारा वक्ते व मदतनीस नळे उपस्थित होत्या.सदर कार्यक्रमाचा समारोप उपस्थितांचे आभार मानून शिक्षिका मनिषा शिंपी यांनी केला.*

मतदान जनजागृतीची प्रसारमाध्यमांनी घेतली दखल






Saturday, 5 October 2019

मतदान जनजागृती २०१९/२०

https://youtu.be/QUC6UHLxCtk

*शालेय मंत्रिमंडळ निवडणूकीसाठी Evm चा वापर*
---------------------------------------
 *शालेय मंत्रिमंडळ निवडणूकीसाठी Evm चा वापर झालात ना चकीत! हो हे खरे आहे.कोपरगाव तालूक्यातील जेऊर कुंभारी गावातील (यादीभाग१७६)हॕरिसन ब्रँचच्या जिल्हा परिषद शाळेत नुकतीच शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक झाली.निमित्त होते येत्या विधानसभा निवडणूकीत(२१ अॉक्टोंबर)मतदारांनी आपला हक्क लक्षात घेऊन १००% मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन मतदान करावे,म्हणून जनजागृती....या निवडणूकीत शाळेतील  शिक्षक श्री.नवनाथ सुर्यवंशी सर यांनी Voting macine या ॲन्ड्राॕईड ॲपचा वापर करून टॕबच्या सहाय्याने मतदान घेतले.*
      *आपला भारत देश हा लोकशाहीप्रधान देश आहे.आपल्या देशापासून तर गावापर्यंतचा कारभार पाहण्यासाठी जनतेतून लोकप्रतिनिधी निवडणूक प्रक्रिया राबवून निवडून दिलेले असतात.हॕरिसन ब्रँच शाळेत एकूण ६ पदासाठी ही निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली.निवडणूकीच्या आदल्या दिवशी ॲपमध्ये नामनिर्देशन फॉर्म भरून घेऊन उमेदवारांची नावे नोंदविण्यात आले.निवडणूकीतून माघार घेण्याची वेळही देण्यात आली.प्रचाराला जोरात सुरुवात झाली.अखेर सायंकाळी उद्याच्या मतदानाची वेळ स.९.०० ची ठरविण्यात आली.*
      *निवडणूकीच्या दिवशी शाळा शनिवारी सकाळी असल्याने ठिक ८.३० मिनिटांनी Mock Poll सर्व उमेदवार व उमेदवार प्रतिनिधी समोर घेण्यात आले.यावेळी जेऊर कुंभारी गावचे सरपंच सौ.सविताताई दळवी,उपसरपंच श्री.यशवंतराव आव्हाड,केंद्रप्रमुख श्री.दिलीपराव ढेपले,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.शैलेश दळवी,सदस्य श्री.शाम पवार व शिक्षक उपस्थित होते.सदर निवडणूक प्रक्रियेत एकूण सहा जागांसाठी १८ विद्यार्थी उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते.प्रत्येक मतदार सहा जागांसाठी मतदान करत होता.विशेष म्हणजे Ballot बटनही मतदारच दाबत होता,परंतू कोणीही बोगस मतदान किंवा जादा मतदान केले नाही.*
     *हॕरिसन ब्रँच शाळेचा पट ४५ असून  १००% उपस्थिती दररोज असते.व आज मतदानही १००% झाले.ठिक १० वाजता मतदानाची वेळ संपल्यावर Close बटन दाबून मतदान प्रक्रिया संपली.मतदान अधिकारी,श्री.सुर्यवंशी,श्रीम.शिंपी व श्री.दळवी यांनी Tab व इतर साहित्य निवडणूक निर्णय अधिकारी श्री.दिलीपराव ढेपले साहेब व सहाय्यक निवडणूक अधिकारी श्री.विवेक सोनवणे सर यांच्या ताब्यात दिले.निकालासाठी त्यांनी Result बटन दाबून स्क्रीनवर दिसणारा निकाल प्रत्येक उमेदवाराच्या नावासह अहवाल तयार केला.तोपर्यंत सर्व मतदार विद्यार्थी व उमेदवार विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार व पूरक आहार देण्यात आला.विद्यार्थी उमेदवार चिंतेत दिसत होते.त्यांना निवडणूक निकाल काय लागेल याची प्रतिक्षा होती.जेवण झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या कार्यालयात बोलावून घेण्यात आले.व सर्वांच्या उपस्थितीत केंद्रप्रमुख श्री.दिलीपराव ढेपले साहेब यांनी निवडणूकीचा निकाल जाहिर करण्यास सुरुवात केली.निवडणूक जिंकलेले विद्यार्थी निकाल येताच एकच जल्लोष करत होते.एकूणच काय तर "कहीं खूषी तो कहीं गम" अशी परिस्थिती दिसत होती.सर्व निकाल जाहीर झाल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते निवडून आलेली शाळेची मुख्यमंत्री कु.प्रिया पवार,अभ्यासमंत्री-कु.आरती देवकर,सहलमंत्री-चि.अनिकेत सोनवणे,शिस्तमंत्री-चि.प्रणव पवार,आरोग्यमंत्री - चि.कृष्णा पवार व स्वच्छतामंत्री - चि.कुणाल दळवी  या सर्वांचा पेन व गुलाबपुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.*
*यावेळी विद्यार्थ्यांच्या पालकांकडून मतदान संकल्पपत्र भरून घेण्यात आले..व येत्या विधानसभा निवडणूकीत १००% सर्व पात्र मतदार बंधू-भगिनींनी मतदानाचा हक्क बजावण्याची शपथ घेतली..*
         *सदर  निवडणूक प्रक्रीया जेऊर कुंभारी गावच्या सरपंच सौ.सविताताई दळवी,राजेंद्र दळवी व चांदेकसारे केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.दिलीपराव ढेपले यांच्या देखरेखीखाली पार पडली.यावेळी  शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.शैलेश दळवी,श्री.शाम पवार,श्री.साईनाथ जाधव व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. निवडणूक प्रक्रियेनंतर उपस्थित सर्वांचे आभार  शिक्षिका श्रीम.मनिषा शिंपी यांनी मानले.*
☘☘☘☘☘☘☘☘☘☘
    *NAVNATH SURYAWANSHI*
*HARISON BRANCH,KOPARGAON*
*DIST - A,NAGAR*
www.shikshandhara.com

Saturday, 7 September 2019

Google input tools मराठी font


🔮🔮 Google ने त्यांचे *google input tool*  हे विविध भारतीय भाषांसाठी typing साठी तयार केलेले   सॉफ्टवेअर virus defination मुळे remove केले आहे आणि आता *इंटरनेटवर ते कुठंच डाउनलोड* साठी उपलब्ध नाही🔮🔮

💥👉🏻👉🏻 *परंतु* ज्या वेळेस हे डाउनलोड साठी उपलब्ध होते तेव्हाच मी *सर्व 22 भाषांचे सॉफ्टवेअर डाउनलोड* करून ठेवले होते त्यामुळे ते तुम्ही *खालील लिंक वर जाऊन कसे डाउनलोड करायचे हे पाहू शकाल*👇🏻👇🏻👇🏻👇🏻

*https://youtu.be/hfLKb6BaEyk*

♻♻ अशा 22 सॉफ्टवेअर पैकी एकातरी सॉफ्टवेअर ची *आवश्यकता आपल्या इतर बांधवाना पडू शकते* यासाठी या पोस्टला *फॉरवर्ड* करायला विसरू नका ♻♻

Friday, 23 August 2019

इ.१ली @ हॕरिसन ब्रँच


इ. १ली - पाऊस कविता


Skype in the classroom - Bangladesh



*शैक्षणिक उपक्रम - व्यावसायिक व कारागीर मुलाखत व क्षेत्रभेट*
🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤
*☘जि.प.प्राथमिक शाळा हॕरिसन ब्रँच☘*
     *ता-कोपरगाव,जि-अ,नगर*
🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤
                  *आज दि.२३ अॉगस्ट रोजी आमच्या शाळेची क्षेत्रभेट स्थानिक कारागीर कुंभारकाम करणारे श्री.संजयजी दळवी काका यांच्या पवारवस्तीवरील घरी भेट दिली..*
     *तेथे पोळा या सणासाठी मातीचे बैल बनविण्याचे काम सुरु होते.त्यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे मोठ्या उत्साहाने स्वागत केले.विद्यार्थ्यांनी दळवी काकांना विविध प्रश्न विचारून त्यांची अनौपचारीक मुलाखत घेतली.त्यांनीही विद्यार्थी व शिक्षकांच्या प्रश्नांचे समाधान केले..शिक्षणाबरोबर आपल्याकडे व्यावसायिक कौशल्येही हवेत असा संदेश देऊन त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेट देऊन खूष केले.*
          *प्रत्यक्ष मातीचे बैल बनविण्याचा अनुभव शिक्षक व विद्यार्थ्यांनी घेतला. संजय दळवी काका व परिवाराचे आभार शाळेच्या वतीने श्रीम.मनिषा शिंपी मॕडम यांनी मानले.*
☘☘☘☘☘☘☘☘☘☘
     *📝📝श्री.नवनाथ सुर्यवंशी📝📝*                ☘☘www.shikshandhara.com☘☘

Thursday, 22 August 2019

Skype in the Classroom from Blangadesh

Skype session with *Tanzirul Hussain Rabby Sir* from Bangladesh
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*Teaching about 4D Animals*

*आज हॕरिसन ब्रँच शाळेत Skype in the classroom या microsoft च्या innovative उपक्रमांतर्गत बांग्लादेशातील शिक्षकाशी संवाद साधला...त्यांनी आम्हाला आम्ही दोन वर्षापासून वापरत असलेले 4 D Animal बद्दल विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्राण्यांची ओळख करुन देऊन त्यांचे आवाज ऐकवले..*
    *त्यानंतर आम्ही dinosaur Life 4D या ॲपच्या माध्यमातून प्राचीन अवाढव्य प्राण्यांची त्यांना ओळख करुन दिली...😀*

Wednesday, 21 August 2019

जलसाक्षरता गीत (गायन श्रीम.सीमा सोनी मॕडम)

https://youtu.be/tXHCFImB2Y4
         *☘☘इयत्ता - १ ली☘☘*

     *🌧⛈जलसाक्षरता गीत⛈🌧*
               *🌹पाऊस🌹*
      *🎤🎤🎤गायन🎤🎤🎤*
            *श्रीम.सीमा सोनी(उपाध्यापिका)*
         *जि.प.प्राथ.शाळा शहाजापूर*
          *ता-कोपरगाव,जि-अ,नगर*

      *📹📹व्हिडीओ निर्मिती📹📹*
     *श्री.सुर्यवंशी नवनाथ(उपाध्यापक)*
          *जि.प.प्राथ.शाळा हॕरिसन ब्रँच*
            *ता-कोपरगाव,जि-अ,नगर*   
                           *🎞www.shikshandhara.com🎞*

🌳🌴🌳🌴🌳🌴🌳🌴🌳🌴