Welcome



वेबसाईट निर्मिती श्री.नवनाथ सुर्यवंशी सर

Saturday, 10 August 2019

शालेय मंत्रिमंडळ निवडणूकीसाठी Evm चा वापर

*शालेय मंत्रिमंडळ निवडणूकीसाठी Evm चा वापर*
---------------------------------------
 *शालेय मंत्रिमंडळ निवडणूकीसाठी Evm चा वापर झालात ना चकीत! हो हे खरे आहे.कोपरगाव तालूक्यातील जेऊर कुंभारी गावातील हॕरिसन ब्रँचच्या जिल्हा परिषद शाळेत नुकतीच शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक झाली.या निवडणूकीत शाळेतील  शिक्षक श्री.नवनाथ सुर्यवंशी सर यांनी Voting machine या ॲन्ड्राॕईड ॲपचा वापर करून टॕबच्या सहाय्याने मतदान घेतले.*
      *आपला भारत देश हा लोकशाहीप्रधान देश आहे.आपल्या देशापासून तर गावापर्यंतचा कारभार पाहण्यासाठी जनतेतून लोकप्रतिनिधी निवडणूक प्रक्रिया राबवून निवडून दिलेले असतात.हॕरिसन ब्रँच शाळेत एकूण ६ पदासाठी ही निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली.निवडणूकीच्या आदल्या दिवशी ॲपमध्ये नामनिर्देशन फॉर्म भरून घेऊन उमेदवारांची नावे नोंदविण्यात आले.निवडणूकीतून माघार घेण्याची वेळही देण्यात आली.प्रचाराला जोरात सुरुवात झाली.अखेर सायंकाळी उद्याच्या मतदानाची वेळ स.९.०० ची ठरविण्यात आली.*
      *निवडणूकीच्या दिवशी शाळा शनिवारी सकाळी असल्याने ठिक ८.३० मिनिटांनी Mock Poll सर्व उमेदवार व उमेदवार प्रतिनिधी समोर घेण्यात आले.यावेळी जेऊर कुंभारी गावचे सरपंच सौ.सविताताई दळवी,उपसरपंच श्री.यशवंतराव आव्हाड,केंद्रप्रमुख श्री.दिलीपराव ढेपले,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.शैलेश दळवी,सदस्य श्री.शाम पवार व शिक्षक उपस्थित होते.सदर निवडणूक प्रक्रियेत एकूण सहा जागांसाठी १८ विद्यार्थी उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते.प्रत्येक मतदार सहा जागांसाठी मतदान करत होता.विशेष म्हणजे Ballot बटनही मतदारच दाबत होता,परंतू कोणीही बोगस मतदान किंवा जादा मतदान केले नाही.*
     *हॕरिसन ब्रँच शाळेचा पट ४५ असून  १००% उपस्थिती दररोज असते.व आज मतदानही १००% झाले.ठिक १० वाजता मतदानाची वेळ संपल्यावर Close बटन दाबून मतदान प्रक्रिया संपली.मतदान अधिकारी,श्री.सुर्यवंशी,श्रीम.शिंपी व श्री.दळवी यांनी Tab व इतर साहित्य निवडणूक निर्णय अधिकारी श्री.दिलीपराव ढेपले साहेब व सहाय्यक निवडणूक अधिकारी श्री.श्रीकांत साळवे सर यांच्या ताब्यात दिले.निकालासाठी त्यांनी Result बटन दाबून स्क्रीनवर दिसणारा निकाल प्रत्येक उमेदवाराच्या नावासह अहवाल तयार केला.तोपर्यंत सर्व मतदार विद्यार्थी व उमेदवार विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार व पूरक आहार देण्यात आला.विद्यार्थी उमेदवार चिंतेत दिसत होते.त्यांना निवडणूक निकाल काय लागेल याची प्रतिक्षा होती.जेवण झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या कार्यालयात बोलावून घेण्यात आले.व सर्वांच्या उपस्थितीत केंद्रप्रमुख श्री.दिलीपराव ढेपले साहेब यांनी निवडणूकीचा निकाल जाहिर करण्यास सुरुवात केली.निवडणूक जिंकलेले विद्यार्थी निकाल येताच एकच जल्लोष करत होते.एकूणच काय तर "कहीं खूषी तो कहीं गम" अशी परिस्थिती दिसत होती.सर्व निकाल जाहीर झाल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते निवडून आलेली शाळेची मुख्यमंत्री कु.प्रिया पवार,अभ्यासमंत्री-कु.आरती देवकर,सहलमंत्री-चि.अनिकेत सोनवणे,शिस्तमंत्री-चि.प्रणव पवार,आरोग्यमंत्री - चि.कृष्णा पवार व स्वच्छतामंत्री - चि.कुणाल दळवी  या सर्वांचा पेन व गुलाबपुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.*

   *सदर  निवडणूक प्रक्रीया जेऊर कुंभारी गावच्या सरपंच सौ.सविताताई दळवी व चांदेकसारे केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.दिलीपराव ढेपले यांच्या देखरेखीखाली पार पडली.यावेळी  श्री.शाम पवार,श्री,साईनाथ जाधव व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. निवडणूक प्रक्रियेनंतर उपस्थित सर्वांचे आभार  शिक्षिका श्रीम.मनिषा शिंपी यांनी मानले.*
☘☘☘☘☘☘☘☘☘☘
    *NAVNATH SURYAWANSHI*
*HARISON BRANCH,KOPARGAON*
*DIST - A,NAGAR*
www.shikshandhara.com




No comments:

Post a Comment