Welcome



वेबसाईट निर्मिती श्री.नवनाथ सुर्यवंशी सर

Friday, 6 December 2019

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन ........



भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली

"शिक्षण हे वाघीणीचे दूध ते पिल्यानंतर माणूस गुरगुरल्या शिवाय राहत नाही" डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त बालसभेत इ.४ थीचा अनिकेत सोनवणे आपल्या भाषणातून सांगत होता.
              हॕरिसन ब्रँच शाळेत थोर महात्म्यांच्या जयंती,पुण्यतिथीनिमित्त दरवेळी बालसभेचे आयोजन केले जाते.थोर नेत्यांचे जीवनकार्य,त्यांचे सामाजिक कार्य व त्यांना लाभलेली महानता यापासून प्रेरणा घेऊन आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित केले जाते.
     आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून भावपूर्ण आदरांजली वाहीली. यावेळी शाळेतील विद्यार्थी आरती देवकर,प्रिया पवार,अनिकेत सोनवणे,कुणाल दळवी,कार्तिक पवार,अजमल शेख यांची भाषणे झाली.शाळेचे मुख्याध्यापक नवनाथ सुर्यवंशी यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनकार्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली.तर शिक्षिका मनिषा शिंपी व ४ थीच्या विद्यार्थ्यांनी भाषेच्या पाठ्यपुस्तकातील "चवदार तळ्याचे पाणी" हे गीत आपल्या सुमधूर आवाजात म्हणून वातावरण मंत्रमुग्ध करून टाकले. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना दोन मिनिटे शांत उभे राहून आदरांजली वाहून बालसभेचा समारोप झाला.

No comments:

Post a Comment