*कर्तव्याची दोरी*
कर्तव्याची दोरी ओढताना
नेहमीच हसावं
कोणतही काम
हसतच पेलावं
कर्तव्य म्हणजे
नसतो नुसता जाच
जीवनपटावरचा तो असतो
विदुषकाचा नाच
कर्तव्य करताना
अडचणी येतील
आल्या तशा
आनंदाने निघूनही जातील
आलेल्या संकटांना आपण
घाबरून नाही जायचं
कशाला नेहमीच
अपेक्षांच ओझ वाहायचं
कोण काय करतं
कशाला पहायचं
आपल्याच मस्तीत
आपणच जगायचं
कर्तव्य कठोर असतं
दुसऱ्यांची मनेही दुखतात
आपण काही चांगले केलं तरी
अनेकांचे डोळे खुपतात..
कोणतंही काम मात्र
प्रामाणिकपणे करायचं
दुसऱ्याचं सुख शोधताना
आपणही आनंदाने जगायचं
*सुनिता इंगळे(सुर्यवंशी)कोपरगाव*
*मो.नं - ९८८१४६८८३८*
कर्तव्याची दोरी ओढताना
नेहमीच हसावं
कोणतही काम
हसतच पेलावं
कर्तव्य म्हणजे
नसतो नुसता जाच
जीवनपटावरचा तो असतो
विदुषकाचा नाच
कर्तव्य करताना
अडचणी येतील
आल्या तशा
आनंदाने निघूनही जातील
आलेल्या संकटांना आपण
घाबरून नाही जायचं
कशाला नेहमीच
अपेक्षांच ओझ वाहायचं
कोण काय करतं
कशाला पहायचं
आपल्याच मस्तीत
आपणच जगायचं
कर्तव्य कठोर असतं
दुसऱ्यांची मनेही दुखतात
आपण काही चांगले केलं तरी
अनेकांचे डोळे खुपतात..
कोणतंही काम मात्र
प्रामाणिकपणे करायचं
दुसऱ्याचं सुख शोधताना
आपणही आनंदाने जगायचं
*सुनिता इंगळे(सुर्यवंशी)कोपरगाव*
*मो.नं - ९८८१४६८८३८*
No comments:
Post a Comment