Welcome



वेबसाईट निर्मिती श्री.नवनाथ सुर्यवंशी सर

Friday, 12 February 2021

कै.सुभाषराव(आण्णा) आव्हाड यांना भावपूर्ण श्रद्धांजली...

 



कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी गावातील शेतकरी कुटुंबातील सुभाष रंगनाथ पा.आव्हाड  यांची दहा दिवसांपूर्वी प्राणज्योत मालवली आपल्या वर्षातील जीवनातही अनेकांचे संसार उभे करण्यास बरोबरच अनेक तरुणांना हात देत त्यांनी असंख्य जनतेचा व मित्रांचा मोठा परिवार निर्माण केला होता जो आवडे सर्वांना,तोचि आवडे देवाला...हवेहवेसे वाटणारे व्यक्तिमत्व असे अचानक अनंतात विलीन झाले. 

शहरासह ग्रामीण भागातील व्यापाऱ्यांच्या मनात त्यांनी कधी आपले घर निर्माण केले हे कळलेच नाही असे व्यक्तिमत्व सर्वांशी हसत खेळत एकमेकांना वेळप्रसंगी मदत करण्याच्या प्रयत्न त्यांनी नेहमी केला सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदावर कामकाज करताना त्यांनी युवकांचे, शेतकरी,आपल्या परिसरातील शेतमजूर आदींचे प्रश्न सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न केले व त्यांनी आज पर्यंत त्यांच्या कार्यातून त्यांच्या कार्याचा ठसा उमटविला होता. सहकार महर्षी शंकराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक ज्येष्ठ नेते माजी मंत्री शंकरराव कोल्हे साहेब व कारखान्याचे चेअरमन बिपिनदादा कोल्हे साहेब यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली आव्हाड आण्णांनी विविध ठिकाणी शेतकऱ्यांना शेतीसाठी विशेष मार्गदर्शन मिळावे म्हणून विविध शिबिरे, विविध उपक्रम देखील राबविले आहेत.

    आजपर्यंत राबविलेले सर्व उपक्रम यशस्वीपणे पार पडलेली आहेत या उपक्रमात आव्हाड आण्णांचे यांचे विशेष योगदान आहेत.

निवांत क्षणी असताना त्यांनी कधीही वेळ वाया घालवला नाही वेळेचा उपयोग हा योग्यच केला पाहिजे असे गृहीत धरून ते अनेकांशी चर्चेत सहभागी रहायचे लाॕकडाऊन च्या काळात सर्वच नागरिक भीतीच्या वातावरणात होते पण कुठेतरी एक आदराची गरज म्हणून किंवा या दडपणातून बाहेर काढण्यासाठी आपली पण एक जबाबदारी आहे असे समजून ते आपल्या संपर्कातील व्यक्तींना मित्र परिवाराला फोनवर संपर्क करून तब्येतीची विचारपूस करत होते व काळजीबाबत चा सल्लादेखील देत होते परंतु काळाने त्यांच्यावर घाला घातला आणि संपूर्ण जेऊर कुंभारी गावासह कोपरगाव तालुका शोकसागरात बुडाला. 

ज्या ज्या संस्थेवर संचालक, चेअरमन म्हणून कामकाज पाहिले त्या संस्थेतील कर्ज वसुली नेहमीच आघाडीवर राहिले आहेत या संस्थेत मध्ये कर्जवितरण बरोबर ठेवींना संरक्षण कर्तव्य मनापासून बजावले या कार्यातून कर्मचारी संचालक मंडळ यांचा विश्वास संपादन केला होता संस्थेत येणाऱ्या प्रत्येक सभासद ठेवीदार कर्जदाराला आदर देऊन संस्थेविषयी सभासदांच्या जिव्हाळा निर्माण करण्यात यश मिळवले होते असे हे अण्णांचे कार्य होते. अण्णांनी कधीही विश्वासाला तडा जाऊ दिला नाही ये संस्थेचे कार्यक्षेत्र गावा परत जरी असले संस्थेचा कारभार पारदर्शक आहे याची ओळख संपूर्ण तालुक्यात निर्माण झालेली होती त्याचबरोबर संपूर्ण सहकार चळवळीला आदर्शवत ठरला व विशेष म्हणजे अण्णांनी सहकार चळवळीमध्ये कामकाज करतांना  त्यांनी एक आगळीवेगळी ख्याती मिळवली होती.

सुभाष आण्णांनी आज पर्यंत सहकार सामाजिक शैक्षणिक धार्मिक कार्य मोठे योगदान दिले आहे.  जेउर कुंभारी विविध कार्यकारी सोसायटीचे संस्थापक संचालक, ग्रामपंचायतीचे सदस्य, कोपरगाव तालुका नागरी सहकारी पतसंस्थेचे वर चेअरमन व संचालक म्हणून कामकाज पाहिले आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना सोयसुविधा व्हावी यासाठी  

जेऊर कुंभारी दूध उत्पादक सहकारी संस्था स्थापन केली त्या संस्थेचे अनेक वर्ष चेअरमन म्हणून कामकाज पाहिले. त्यांनी शेतकऱ्यांसाठी दिलेले योगदान पाहुन त्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीवर काम करण्याची संधी मिळाली त्या बाजार समितीवर उपसभापती पद देखील भुषविले आहेत.

सहकार महर्षी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन पदे भूषवली आहेत ते विद्यमान संचालक म्हणून कार्यरत होते. जेउर कुंभारी या गावातील विकासासाठी मुख्य योगदान असेल तर ते फक्त अण्णांचे गावातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी कधीही मागे राहिले नाही किंवा त्या विषयावर कानाडोळा देखील कधी केलं नाही. धार्मिक कार्यक्रम घेण्यासाठी अण्णा नेहमी परमपूज्य रमेश गिरी महाराजांचे मार्गदर्शन घ्यायचे. अण्णा जेऊर कुंभारी येथील श्रीकृष्ण मंदिर येथील विश्वस्त म्हणून देखील कामकाज पाहत होते त्याच बरोबर जेउर पाटोदा हद्दीतील संत ज्ञानेश्वर माऊली प्रतिष्ठान चे मुख्य प्रवर्तक म्हणून देखील आण्णांना ओळखले जायचे. अण्णांनी शेती करत असताना देखील त्यांचे शेती विषयावर अभ्यास देखील दांडगा होता. त्यांना शेती तज्ञ म्हणून देखील ओळखले जायचे ज्यावेळी जेऊर कुंभारी चे नाव घेतले जाते त्यावेळी समोरचा व्यक्ती किंवा बाहेर गावी वरून आलेला व्यक्ती हा अण्णांचे नाव सांगितले शिवाय राहत नव्हता. अण्णांना शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार तसेच गो पालन पुरस्कार देखील सन्मान करण्यात आला आहे. शेतीला जोड धंदा असला पाहिजे म्हणून अण्णांनी कांद्याचा व्यापार सुरू केला व मुलांनी देखील अण्णांच्या मार्गदर्शनाखाली ऑटोमोबाईल चे शॉप सुरु केले. असे अफाट काम करणारे सुभाष रंगनाथ पा.आव्हाड आण्णांचा दशक्रीयाविधी असुन असे समाजसेवकाला मिञ परिवार, शेतकरी, सभासद, ठेवीदार, सहकार क्षेञातील सर्व संस्थेचे वतीने, जेऊर कुंभारी ग्रामसंस्थांच्या वतीने भावपूर्ण श्रध्दांजली..!!

          लेखन - श्री.मधूकर वक्ते सर

No comments:

Post a Comment