ग्रहण म्हणजे अवकाशात घडणारा प्रकाश-सावलीचा, आणि खगोलांच्या सापेक्ष स्थानांचा खेळ. जेव्हा निरीक्षक सापेक्ष एक खगोलीय वस्तू दुसऱ्या खगोलीय वस्तूच्या आड येते, म्हणजेच निरीक्षकासाठी पहिली वस्तू दुसऱ्या वस्तूला झाकते, तेव्हा पहिल्या वस्तूने दुसऱ्या वस्तूला ग्रहण लावले असे म्हणतात .
ग्रहणं तीन प्रकारची असतात. खग्रास, खंडग्रास आणि कंकणाकृती. ग्रहणाच्या स्थितीत सूर्य, चंद्र आणि पृथ्वीमधलं अंतर किती आहे? ते नेमके सरळ रेषेत आहेत का? आणि तुम्ही पृथ्वीवर नेमके कुठे आहात? या तीन गोष्टींवर ग्रहणाचा प्रकार अवलंबून असतो
१. पृथ्वीवरून पाहताना सूर्य पूर्णपणे झाकला जातो त्याला 'खग्रास सूर्यग्रहण' असं म्हणतात. सूर्याचा केवळ काही भाग झाकलेला दिसतो, त्याला 'खंडग्रास सूर्यग्रहण' असं म्हणतात.
२. एरवी चंद्र सूर्यापेक्षा, अगदी पृथ्वीपेक्षाही खूपच लहान आहे. पण तो पृथ्वीपासून जवळ आहे. त्यामुळं पृथ्वीवरून पाहताना आपल्याला सूर्य आणि चंद्र आकारानं एकसारखे दिसतात. आणि म्हणूनच खग्रास स्थितीत चंद्राचं बिंब सूर्यबिंबाला पूर्णपणे झाकू शकतं.
पण पृथ्वी आणि चंद्राच्या कक्षा काहीशा लंबगोलाकार आहेत. चंद्र या कक्षेत पृथ्वीपासून दूरच्या बिंदूजवळ असतो, अशा वेळी पृथ्वीवरून चंद्रबिंबाचा आकार सूर्यबिंबापेक्षा लहान दिसतो.
३. जेव्हा सूर्यग्रहण होतं, तेव्हा चंद्र सूर्यबिंबाच्या मधोमध येतो; पण सूर्य पूर्णपणे झाकला जात नाही, तर एखाद्या कंकणासारखी म्हणजे बांगडीसारखी सूर्याची कडा दिसून येते. त्यालाच 'कंकणाकृती सूर्यग्रहण' म्हणतात. सूर्याच्या या स्थितीला खगोलप्रेमींनी 'Ring of Fire', अग्निवलय, अग्निकंकण अशीही नावं दिली आहेत.
२१ जून २०२० रोजी म्हणजेच रविवारी सूर्यग्रहण आहे. हे सूर्यग्रहण भारतातील काही भागांतून पहायला मिळणार आहे. २१ जून म्हणजेच रविवारी शतकातील सर्वात मोठे सूर्यग्रहण आहे.म्हटलं जात आहे की हे सूर्यग्रहण देशातील बऱ्याच भागात कंकणाकृती स्थितीत दिसेल. कंकणाकृती स्थितीत चंद्र हा सूर्याच्या समोर येतो आणि त्यामुळे सूर्याचा काही भाग झाकला जातो. या परिस्थितीला कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणतात.२१ जून रोजीचं सूर्यग्रहण हे आफ्रिकेतील कांगो येथून सुरू होणार आहे आणि त्यानंतर इथिओपिया, येमेन, ओमान, सौदी अरेबिया, हिंद महासागर, पाकिस्तान नंतर भारतातील राजस्थानमध्ये प्रवेश करेल. भारतानंतर तिबेट, चीन, तैवानच्या दिशेने प्रशांत महासागराच्या मध्यभागी सूर्यग्रहण समाप्त होईल.
२१ जून रोजी रविवारी सकाळी १०.१७ मिनिटांनी ग्रहणाला सुरूवात होईल. तर, दुपारी १२ वाजून १० मिनिटांपर्यंत सूर्यग्रहणाचा मध्यकाळ असेल आणि दुपारी २ वाजून २ मिनिटांनी सूर्यग्रहण समाप्त होईल. २१ जून २०२० रोजीचं सूर्यग्रहण झाल्यानंतर २०२० या वर्षाच्या शेवटी आणखी एक सूर्यग्रहण होणार आहे. यावेळी सूर्यग्रहण हे भारतातूनही पहायला मिळणार आहे मात्र, ग्रहण पाहताना डोळ्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा ते तुमच्या डोळ्यांना दुखापत करु शकतं .हे सूर्यग्रहण भारतातील काही भागांत दिसणार आहे. यासोबतच आशिया, आफ्रिका, हिंद महासागर, युरोपमधील काही भागांत आणि ऑस्ट्रेलियातही पहायला मिळणार आहे. २१ जून रोजीचं सूर्यग्रहण २५ वर्षांपूर्वी झालेल्या २४ ऑक्टोबर १९९५ रोजीच्या ग्रहणाची आठवण करुन देईल. त्या दिवशी झालेल्या सूर्यग्रहणाने अनेक भागांत काहीसा अंधार झाला होता. त्याच प्रमाणे यावेळी सुद्धा अंधार होण्याची शक्यता आहे.
सूर्यग्रहण पाहताना काळजी-
सूर्यग्रहण पाहताना आवश्यक काळजी घेणं गरजेचं आहे. नुसत्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहिल्यास त्यामुळे डोळ्यांना अपायकारक ठरु शकतं. सूर्यग्रहण पाहण्यासाठी दुर्बिण, टेलिस्कोप, ऑप्टिकल कॅमेराच्या सहाय्याने पाहता येऊ शकतं.
२०२० या वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण हे १४ डिसेंबर रोजी होणार आहे. या ग्रहण काळात चंद्र हा सूर्याला पूर्णपणे झाकेल आणि पृथ्वीवर त्याची सावली पहायला मिळेल.
शब्दांकन - श्री.नवनाथ पांडूरंग सुर्यवंशी
जि.प.प्राथमिक शाळा ,हरिसन ब्रँच
ता.कोपरगाव जि.अ.नगर



ग्रहणं तीन प्रकारची असतात. खग्रास, खंडग्रास आणि कंकणाकृती. ग्रहणाच्या स्थितीत सूर्य, चंद्र आणि पृथ्वीमधलं अंतर किती आहे? ते नेमके सरळ रेषेत आहेत का? आणि तुम्ही पृथ्वीवर नेमके कुठे आहात? या तीन गोष्टींवर ग्रहणाचा प्रकार अवलंबून असतो
ReplyDeleteVery nice information about solareclipse
ReplyDeleteThanks sirji
Deleteअतिशय उपयुक्त व अभ्यासपूर्ण माहिती...धन्यवाद...
ReplyDeleteThanks sirji
Delete