दि.१० जून हा 'जागतिक दृष्टीदान दिन ' म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. मानवी जीवनात दृष्टीला अनन्यसाधारण महत्त्व आहे.'असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी 'किंवा 'दृष्टी आड सृष्टी' ह्या म्हणी तयार झाल्या आहेत. माणूस जगातील सृष्टी सौंदर्य आपल्या नयनात साठवून ठेवतो. त्यामूळे डोळ्यांना मानवाच्या पंचेद्रीयामध्ये मानाचे स्थान आहे. डोळ्यांचा उपयोग नयनरम्य, मनोहर सृष्टी सौंदर्य टिपण्याबरोबर मनात स्थान निर्माण करुन त्यांची छबी मनपटलाबरोबर सुंदर चित्राद्वारे इतरांनाही देता येते.मानवाच्या शरीराची पंचइंद्रीये त्यांना नेमून दिलेले कार्य करणारी असतील तर त्यांचा उपयोग आहे. शरीरावर नुसती पंचेद्रीये आहेत.पण ती सशक्त ,सुदृढ ,व कार्यरत नसतील तर काय कामाची?तसेच बाहेर नयनमनोहर सृष्टी सौंदर्य आहे पण आपण ती पाहू शकत नाहीत तर त्याचा काय उपयोग ?दैनंदिन जीवनात पदोपदी आपल्याला डोळ्यांची आवश्यकता भासते. प्रत्येक गोष्ट बघण्याची क्रिया डोळ्यांनी होते पण तेच कमकुवत किंवा पूर्ण दृष्टीहिन असतील तर काय होईल ?दृष्टीहिन मानवाला नयनसुख मिळावे यासाठी नेत्रदान किंवा दृष्टीदान प्रत्येक मानवाने केल्यास त्याचा फायदा जगातील नेत्रहिन मानवास होवू शकेल. अर्थात नेत्रदान मरणोत्तर केल्यास मानवी जीवनात त्याचा उपयोग अंध व्यक्तीस नक्कीच होईल .मानवाच्या जीवनात डोळेच फक्त मरणोत्तर अंधांना मदत करु शकतात. दृष्टीदानामूळे एक माणूस दुसऱ्या अंध व्यक्तीच्या जीवनात दृष्टीचा दिवा लावून त्याच्या जीवनातील अंधकार दूर करु शकतो.प्रत्येक माणसाने नेत्रदानाचा संकल्प केल्यास जगातील कित्येक अंधाना दृष्टी मिळू शकते.अंध व्यक्तीही आपल्यासारख्याच व्यक्ती आहेत .हे सुंदर जग अनुभवयाचा ,बघण्याचा आपल्याप्रमाणे त्यांनाही हक्क आहे.म्हणूनच आजच्या जागतिक नेत्रदिनी आपण सर्व असा निर्धार करु कि आपण आपले डोळे मरणानंतर आपल्या आंध देशबांधवासाठी दान करुन परमेश्वराने आपल्याला डोळस जन्माला घातल्याचे व समाजाचे आपल्यावरील ऋण या सुवर्ण संधीचा लाभ घेऊन फेडता येण्यासारखे आहे.एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर लवकरात लवकर डॉक्टरांना पाचारण केल्यास त्या मृत व्यक्तीचे डोळे डॉक्टर घरच्या १५ ते २० मिनिटांत काढू शकतात.त्यासाठी मृत व्यक्तीच्या दोन्ही डोळ्यांवर ओला रुमाल ठेवणे गरजेचे आहे.त्याच्या डोक्यावर पंखा चालू नसावा.त्याच्या डोक्यावर पंखा चालू नसावा .त्याचे डोके उशीवर ठेवणे गरजेचे आहे.जसे आपण जिंवतपणी रक्तदान किंवा एखाद्या आपल्या जवळच्या नातलगाला किडणीदान करतो तसेच आपण मरणोत्तर आपले नेत्र दान करु शकतो.त्यासाठी अगोदर आपली लेखी संमती एका विहित नमुन्यातील अर्जात भरुन आपल्या नजिकच्या सरकारी किंवा खाजगी अधिकृत नेत्र पेढीशी संपर्क साधून करावी लागते.एखाद्या व्यक्तीला असाध्य आजार असल्यास त्या व्यक्तीस नेत्रदान करता येत नाही.मात्र निरोगी व्यक्तीस नेत्रदान करता येते.आपले पुढचे एक पाऊल एखाद्या अंध व्यक्तीला दृष्टी देवू शकते. त्याचे डोळे हे सुंदर जग पाहू शकतात.चला संकल्प करुया नेत्रदानाचा.
श्री.नवनाथ पांडूरंग सुर्यवंशी
जि.प.प्राथमिक शाळा हरीसन ब्रँच
ता.कोपरगाव जि.अ.नगर.
मो.न. 8308207882.
Nice article
ReplyDelete